Aadhaar : आपल्याला बऱ्याच कामांसाठी आधार कार्ड गरजेचे असते. जर ते आपल्याकडे नसेल तर आपली अनेक कामं रखडली जातात. त्यामुळे आधार कार्ड असणे खूप गरजेचे आहे. आधार कार्ड हे शाळा-कॉलेज, ऑफिस, बँक खातं चालू करण्यासाठी, कर्ज काढण्यासाठी तसेच ओळख पटवून देण्यासाठी यांसारख्या बऱ्याच गोष्टींसाठी आधार कार्ड गरजेचे असते.
खास करून जर एखाद्या व्यक्तीचे निधन झाले असेल, तर त्या व्यक्तीच्या आधार कार्डाबाबत विशेष काळजी घेणं गरजेचं असते. कारण त्या व्यक्तीच्या आधार कार्डचा चुकीचा वापर होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे फसवणूक टाळण्यासाठी काही कामे आत्ताच करा.

करा हे काम
स्टेप 1
- जर तुमच्या ओळखीच्या एखाद्या व्यक्तीचे निधन झाले असेल, तर तुम्ही त्याचे/तिचे आधार कार्ड ब्लॉक करू शकता. ज्यामुळे त्याचा गैरवापर होणार नाही.
- यासाठी तुम्हाला UIDAI च्या अधिकृत वेबसाइट http://uidai.gov.in वर जावे लागणार आहे.
स्टेप 2
- यानंतर येथे तुम्हाला ‘My Aadhaar’ चा पर्याय दिसेल, ज्यावर तुम्हाला क्लिक करावे लागणार आहे.
- त्यानंतर तुम्हाला लॉक्ड किंवा अनलॉक आधार कार्डचा पर्याय दिसेल.
स्टेप 3
- तुमच्यासमोर हे पर्याय दिसताच ते निवडा
- आता तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार कार्ड क्रमांक टाकावा लागणार आहे.
स्टेप 4
- आता कार्डधारकाचे पूर्ण नाव आणि पिन कोड टाका
- यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक वन टाईम पासवर्ड (OTP) येईल, म्हणजेच आधार कार्ड लिंक्ड नंबर तुम्हाला टाकावा लागणार आहे.
- हे केल्यानंतर तुमचे आधार कार्ड ब्लॉक होऊ शकते.