5G Fraud: देशात 5G मोबाईल सेवा (5G mobile services) सुरू झाली आहे. जिओ आणि Airtel ची 5G सेवा अनेक शहरांमध्ये सुरू करण्यात आली आहे. मात्र, यामुळे घोटाळेबाजही सक्रिय झाले आहेत. 5G सेवेच्या नावाखाली ते लोकांची फसवणूक (5G fraud) करत आहेत. यामुळे त्यांचे बँक खाते (bank account) रिकामे होऊ शकते. याबाबत पोलिसांनी इशाराही दिला आहे.
हैदराबाद सायबर पोलिसांनी 5G संदर्भात सुरू असलेल्या घोटाळ्याबाबत सतर्क केले आहे. युजर्सनी फोनवर दिसणाऱ्या लिंकवर क्लिक करू नये, असे या वॉर्निंगमध्ये म्हटले आहे. यामुळे त्यांचे बँक खाते रिकामे होऊ शकते.
फोनमध्ये सापडलेल्या अनोळखी लिंकवर (unknown link) क्लिक करून लोकांच्या बँक खात्यातून पैसे कापले गेले, यासंदर्भात त्यांच्याकडे अनेक तक्रारी येत असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. यामुळे इतर लोकांनीही या नव्या फसवणुकीपासून सावध राहण्याची गरज आहे.
4G वरून 5G वर सिम अपग्रेड करण्याच्या नावाखाली फसवणूक –
या घोटाळ्यात लोकांना लिंक पाठवली जाते. यामध्ये असे म्हटले आहे की, 4G वरून 5G वर अपग्रेड (Upgrade from 4G to 5G) करण्यासाठी तुम्हाला या लिंकवर क्लिक करावे लागेल. तो अधिकृत संदेश मानून, लोक त्यावर क्लिक करतात. पण, यामुळे तुमचा डेटा स्कॅमरपर्यंत पोहोचतो.
एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, लिंकवर क्लिक केल्यावर सायबर क्रिमिनलला (cyber criminal) फोन नंबरशी जोडलेल्या बँक खात्याची माहिती मिळते. त्यानंतर ते फोन नंबर ब्लॉक करतात आणि सिम स्वॅप करतात. यासह, वापरकर्त्याचे सिम ब्लॉक केले जाते आणि स्कॅमरना त्यात प्रवेश मिळतो.
याचा फायदा घेत घोटाळेबाज बँक खाते रिकामे करतात. 4G वरून 5G वर स्विच करून फसवणूक लिंकवर क्लिक करू नका, असे सायबर सेलने म्हटले आहे. तुम्हाला असा कोणताही मेसेज मिळाल्यास, नेटवर्क ऑपरेटरशी त्याची खात्री करून घ्या.