Bank Account Rule : सध्याच्या काळात लहान मुलांपासून ते वयस्कर व्यक्तींचे बँकेत खाते असते. कारण आर्थिक व्यवहार करत असताना बँक खाते गरजेचे असते.
जर तुम्ही एखाद्या बँकेत नवीन बचत खाते उघडत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण खाते उघडण्यापूर्वी काही गोष्टी जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. नाहीतर पुन्हा आर्थिक संकट येते.
क्रमांक 1
जर तुम्ही कोणत्याही बँकेत बचत खाते उघडत असाल तर सर्वात अगोदर व्याजदर जाणून घ्या. कारण बँक बचत खात्यात जमा केलेल्या पैशावर प्रत्येक व्याज देते. त्याशिवाय प्रत्येक बँकेचे व्याजदरही वेगवेगळे असते. त्यासाठी सर्वात जास्त व्याज देणाऱ्या बँकेत खाते चालू करा.
क्रमांक 2
दुसरे म्हणजे जेव्हा तुम्ही बँकेत खाते उघडता तेव्हा एका महिना, 3 महिने किंवा वेगवेगळ्या वेळी कोणतेही शुल्क भरू नका. कारण बऱ्याच बँका चेकबुक, एटीएम व्यतिरिक्त अनेक प्रकारचे मासिक शुल्क ठेवतात.
क्रमांक 3
बचत खात्यांत किमान रक्कम ठेवणे गरजेचे आहे. कारण जर पैसे खात्यात नसतील तर बँक तुमच्याकडून दंड घेते. त्यामुळेच सर्वात अगोदर अशी बँक निवडा जी कमी रक्कम ठेवत आहे किंवा अनेक बँका शून्य शिल्लकचा पर्याय देतात.
क्रमांक 4
खाते चालू करणाऱ्या बँकेच्या खात्याशी निगडित सर्व नियम जाणून घ्या. म्हणजेच पैसे काढण्याची सुविधा, एटीएममध्ये किती व्यवहार विनामूल्य आहे? तसेच चेकबुकसाठी किती शुल्क आकारले जाते? इत्यादी गोष्टी घ्या