Salt Side Effects : मीठ हा अन्नाचा एक महत्त्वाचा भाग आहे असे म्हणले तरी हरकत नाही. कारण मिठामुळे आपल्या जेवणाची चव वाढते. मीठाशिवाय आपण अन्नाची कल्पनाही करू शकत नाही. मिठामुळे जेवणाची चव वाढून शरीर निरोगी राहते. एखाद्यावेळी आपल्याला जेवणात मीठ कमी असले तरी चालते.
परंतु, जेवणात जास्त मीठ असेल तर आपण ते खाऊ शकत नाही. जर जास्त प्रमाणात मीठ खाल्ले तर उच्च रक्तदाब, तसेच किडनीच्या त्रासाला सामोरे जावे लागते. अनेकांना जास्त मीठ खाण्याची सवय असते. तर तुम्हीही जास्त मीठ खात असाल तर सावध व्हा.

असा होतो परिणाम
मीठ जास्त असलेले अन्न खाल्ले तर विशिष्ट प्रकारच्या जन्मजात रोगप्रतिकारक पेशींचे चयापचय आणि उर्जा संतुलन बिघडण्याची शक्यता असते. यालाच मोनोसाइट्स आणि मॅक्रोफेज असेही म्हणतात. त्या योग्यरित्या कार्य करण्यापासून प्रतिबंधित करतात. इतकेच नाही तर, जास्त मिठामुळे आपल्या पेशींचे उर्जा संयंत्र मायटोकॉन्ड्रियामध्ये बिघाड होतो. मीठ जास्त खाल्ल्याने अनेक प्रकारे आपल्या आरोग्यास हानी पोहोचते. कसे ते जाणून घेऊ.
- जास्त मीठ खाल्ले तर पाणी टिकून राहते, ज्यामुळे फुगणे आणि सूज येण्याची शक्यता असते.
- जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने उच्च रक्तदाब, हृदयविकार आणि पक्षाघाताचा धोका वाढण्याची शक्यता असते.
- जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने टाईप 2 मधुमेह होण्याच्या जोखमीशी निगडित आहे.
- तसेच तुमच्या लैंगिक जीवनावरही परिणाम निर्माण होण्याची शक्यता असते.
- जास्त मीठ तुमच्या मूत्रपिंडांनाही हानी पोहोचवू शकते तसेच कालांतराने तुमची किडनी निकामी होऊ शकते.
- इतकेच नाही तर झोप लागत नाही.













