Ahmednagar News : सावधान ! अहमदनगर जिल्ह्यात चार ठिकाणी मोटारसायकलची चोरी

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

चार ठिकाणी ‘मोटारसायकलची चोरी झाली. अरबाज जाफर शेख यांची १५ हजार रुपये किंमतीची मोटारसायकल गेवराई रोड, हॉटेल साईबन येथून चोरीस गेली. ही घटना १६ ऑगस्ट रोजी घडली.

शेवगाव पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल आहे. मच्छिंद्र पुंजारी वाघस्कर यांची १५ हजार रुपये किंमतीची मोपेड (क्र. एमएच १६, बीई ४५५३) बेलेश्वर मंदिराजवळून चोरीस गेली. ही घटना २८ ऑगस्ट रोजी घडली. भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

नंदकुमार ठकाजी गायकवाड यांची २५ हजार रुपये किंमतीची मोटारसायकल मल्हारनगर (नवनागापूर) येथून चोरीस गेली. ही घटना २२ ऑगस्ट रोजी घडली. एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद आहे.

तसेच ओंकार चंद्रकांत भिंगारदिवे यांची २० हजार रुपये किंमतीची मोटारसायकल कन्हैय्या डेअरी (नेप्ती चौक) येथून चोरीस गेली. तोफखाना ‘पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe