अहमदनगर Live24 टीम, 11 सप्टेंबर 2021 :- उत्तर नगर जिल्ह्यास वरदान समजले जाणारे भंडारदरा धरण ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे. उद्या रविवारी सायंकाळ पर्यन्त धरण काठोकाठ भरण्याची शक्यता आहे.
अकोले, संगमनेर, राहाता ,श्रीरामपूर या तालुक्यांतील हजारो एकर शेतीला पाणी पुरविणाऱ्या या धरणावर अनेक साखर कारखाने, दूध संघ यांचे भवितव्य या धरणावर अवलंबून आहे.
भंडारदरा धरणांचे पाणलोट क्षेत्र १२१ चौ.की.आहे.पण येथे तीन ते पाच हजार मिमी पाऊस पडतो दोन दिवसांपासून धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत आहे.
त्यामुळे धरणात मोठ्या प्रमानात नवीन पाण्याची आवक सुरू आहे. आज दिवस भराच्या 12 तासात धरणात 236 दलघफु पाण्याची आवक झाली,आज सायंकाळी पाणी साठा 10 हजार 559 दलघफु झाला होता.
धरण 95.65 टक्के भरले असून सध्या सुरू असणारा पावसाचा जोर लक्षात घेता उद्या रविवारी भंडारदरा धरण100 टक्के भरेल असा विश्वास भंडारदऱ्याचे शाखा अभियंता अभिजित देशमुख यांन व्यक्त केला.धरण भरल्या नंतर स्पीलवे मधून ओव्हरफलोचे पाणी सोडण्यात येणार आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम