भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलच्या खेळाडूची राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेसाठी निवड

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 06 फेब्रुवारी 2021:- येथील अ.ए.सो. च्या भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलचा खेळाडू ओम बाबासाहेब करांडे याची राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

नुकतीच वेरुळ (जि. औरंगाबाद) येथे महाराष्ट्र राज्य सायकलिंग फेडरेशनच्या वतीने झालेल्या राज्यस्तरीय सायकलिंग स्पर्धेत करांडे याने 16 वर्षाखालील गटात रौप्य पदक पटकाविल्याबद्दल त्याची दि.5 ते 8 मार्च दरम्यान पनवेल (मुंबई) येथे होणार्‍या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

करांडे याने राज्यस्तरीय सायकलिंग स्पर्धेत 20 किलोमीटरचे अंतर 29 मिनिटे 43 सेकंदात पार केले. त्याला क्रीडा शिक्षक अरविंद आचार्य यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया, सहकार्यवाह गौरव फिरोदिया, उपाध्यक्ष अशोक मुथा, खजिनदार प्रकाश गांधी, विद्यालयाचे मुख्याध्यापक

उल्हास दुगड, उपमुख्याध्यापक संजय पडोळे, पर्यवेक्षक रवींद्र लोंढे, सुवर्णा वैद्य, अभिमन्यू डुबल यांनी यशस्वी खेळाडू व मार्गदर्शक क्रीडा शिक्षकांचे अभिनंदन केले. तर पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment