नागपूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काही दिवसांपूर्वी मशिदीवरील भोग्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे अनेक स्तरातून त्यांच्यावर टीका होताना दिसत आहे. रिपब्लिकन (Republican) पार्टीचे नेते रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनीही राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
राज ठाकरे यांच्यावर टीका करताना रामदास आठवले म्हणाले, एका बाजूला भोंगे आहेत, तर दुसऱ्या बाजूला सोंगे आहेत, असं ते म्हणाले. भोंगे लावायचे तर लावा आमचा काही विरोध नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
राज ठाकरे यांच्या भोंग्याच्या भूमिकेला माझा विरोध आहे. राज ठाकरेंच्या भूमिकेला भाजपचा (BJP) पाठिंबा नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींना सबका साथ सबका विकास हवा आहे.
भारतातील मुस्लीम पूर्वी हिंदू होते. त्यामुळे एक दुसऱ्यांच्या धर्माचा आदर करावा. मस्जीदचे भोंगे काढण्याला विरोध आहे. मंदिरात राज ठाकरे यांनी भोंगे लावावे.
राज ठाकरे यांना आधीच सुरक्षा आहे. केंद्र सरकार विचार करणार आहे. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. केंद्र सरकार अत्यंत चांगलं चाललंय. 2024 मध्ये केंद्रात आमचंच सरकार येईल असेही रामदास आठवले म्हणाले आहेत.
रामदास आठवले यांनी आघाडी सरकारावरही भाष्य केले आहे. ते म्हणाले, राज्य सरकार पडावं असं मला वाटतं. पण सध्या सरकार पडण्यासारखी स्थिती नाही. सरकार पडलं तर सरकार बनवण्याची आमची तयारी आहे.
सरकार पडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. सरकार पडलं तर विश्वास प्रस्तावाच्या वेळेस बरेच आमदार अनुपस्थित राहणार. आम्ही विश्वास प्रस्ताव जिंकू. आता कुणा आमदाराला निवडणूक नको, असंही ते म्हणाले.
काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सेनेचे आमदार नाराज आहेत. विश्वास प्रस्तावाच्या वेळेस शिवसेनेचे आमदार गैरहजर राहतील. बऱ्याच सेना आमदारांना भाजपसोबत जाण्याची इच्छा आहे. असाही दावा आठवलेंनी केला आहे.