बिग ब्रेकिंग : कॉर्डालिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील साक्षीदार प्रभाकर साईलचा मृत्यू

Content Team
Published:

मुंबई : मध्यंतरी क्रूझ ड्रग्ज प्रकरण (Cruise Drugs Case) चांगलेच गाजले होते. यामध्ये अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला अटक करण्यात आली होती. यामध्ये साक्षीदार म्हणून असलेले प्रभाकर साईल (Prabhakar Sail) यांचा मृत्यू झाला आहे.

प्रभाकर साईल यांचा शुक्रवारी दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) मृत्यू (Death) झाला असल्याची माहिती मिळत आहे. ड्रग्ज प्रकरणी आर्यन खान याला अटक केल्यानंतर किरण गोसावी (Kiran Gosavi) हा चर्चेत आला होता.

प्रभाकर साईल हा किरण गोसावी याचा अंगरक्षक (Bodyguard) होता. प्रभाकर साईलचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी सकाळी ११ वाजता त्याच्या अंधेरी मधील घरी आणण्यात येणार आहे. त्यानंतर अंत्यसंस्कार (Funeral) करण्यात येणार आहेत.

प्रभाकर साईल यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईतील चेंबूर येथील माहुल भागातील राहत्या घरी मृत्यू झाला आहे. अशी माहिती प्रभाकर साईल यांचे वकील तुषार खंदारे (Lawyer Tushar Khandare) यांनी दिली आहे.

कोण होते प्रभाकर साईल?

प्रभाकर साईल हा किरण गोसावी यांचा अंगरक्षक होता.
क्रूझ ड्रग्ज प्रकरणात प्रथम क्रमांकाचे पंच
किरण गोसावींकडेच याची राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था

क्रूझ ड्रग्ज प्रकरणा दिवशी नेमकं काय झाले?

या दिवशी प्रभाकर साईल याने जबाब दिला होता. त्याने त्याने म्हंटले होते की, क्रूझ कारवाई झाली त्या दिवशी मी किरण गोसावींसोबतच होतो. किरण गोसावी एनसीबी ऑफिसला गेले. मी खालीच थांबलो होतो.

गोसावी बरोबर सव्वा बारा वाजता खाली आले. आम्ही तिथून जवळच जाऊ फ्रँकी, थम्स अप घेतलं. तिथू ग्रीन गेटला गेलो. ग्रीन गेटच्या आत गेलो तिथे समीर वानखेडे, त्यांचे सहकारी बसले होते तिथे त्यांना फ्रँकी आणि पाणी-थम्सअप वगैरे दिले.

नंतर क्रूझच्या बाहेर गेलो. तिथून मला एका ठिकाणी थांबवून बाहेर जाऊ नको असे सांगितलं. मला काही फोटो दाखवण्यात आले होते आणि ते फोटो असलेले लोक आले की त्यांना ओळखायला सांगितलं होतं. फोटोतल्या व्यक्ती आल्या की मला गोसावींना रिपोर्ट करायचं होतं असा जबाब त्याने दिला होता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe