बिग ब्रेकिंग : ‘धनुष्यबाण’ कोणाला ? अखेर निर्णय झाला ! शिवसेना पक्षाचे नावही वापरता…

प्रतिक्षेत असलेल्या एका महत्त्वाच्या मुद्द्यावर आज निर्णय घेण्यात आला. अंधेरीच्या पोटनिवडणुकीसाठी, उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे यांच्यापैकी कोणत्याही गटाला शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह वापरता येणार नाही, असे राष्ट्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण आयोगाकडून गोठवलं गेलं आहे. शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटांना हे चिन्ह वापरता येणार नाही. शिवसेना पक्षाचे नाव देखील या दोन्ही गटांना वापरता येणार नाही. नव्या चिन्हासाठी सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत आयोगाला पर्याय द्यायचे आहेत, अशी माहिती मिळाली आहे.

शिवसेना-शिंदे गटानं कागदपत्र सादर केल्यानंतर दिल्लीत निवडणुक आयोगाची बैठक झाली. निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या नेतृत्वात ही बैठक झाली.केंद्रीय निवडणूक आयोगाची ही बैठक तब्बल 4 तासानंतर संपली.

शिवसेना आणि शिंदे गटाकडून प्रतिज्ञापत्र सादर केल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने ही महत्वाची बैठक घेतली. शिवसेनेला पुरावा सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते.

त्यानुसार शिवसेनेने कागदपत्रांचा 700 पानांच गठ्ठा निवडणूक आयोगाकडे सादर केला होता. निवडणूक आयोगानं धनुष्यबाण चिन्हावर त्वरित सुनावणी घेऊ नये अशी शिवसेनेची मागणी आहे.

एकनाथ शिंदे अंधेरी पोटनिवडणुकीत उमेदवार देणार नाहीत त्यामुळे सर्व कागदपत्र सादर होईपर्यंत सुनावणी घेऊ असं शिवसेनेचे म्हणण आहे. केवळ भाजपला फायदा होण्यासाठी शिंदेंची त्वरित सुनावणीची मागणी असल्याचा दावा देखील शिवसेनेने केला आहे.

अंधेरी पूर्व मतदार संघातील शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचं निधन झालं आहे. त्यामुळे या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूकीसाठी 3 नोव्हेंबरला मतदान होणार असून 6 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.