अहमदनगर Live24 टीम, 09 ऑक्टोबर 2021 :- तालिबानने अफगाणिस्तानची सत्ता काबीज केल्यापासून कायम अस्थिर वातावरण आहे. अफगाणिस्तानच्या उत्तरी कुंदुंज प्रांतात शुक्रवारी
मशिदीमध्ये झालेल्या भीषण स्फोटात जवळपास १०० जणांचा मृत्यू झाला व अनेकजण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आला आहे.
प्राथमिक माहितीनुसार अफगाणिस्तानच्या कुंदुज प्रांतात शक्तीशाली स्फोट झाला आहे ,स्फोटात 100 लोक मारले गेले आहेत.एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, शिया मशिदीजवळ स्फोट झाला तेव्हा नागरिक नमाज अदा करत होते.
आतापर्यंत या स्फोटाची जबाबदारी कुणी स्वीकारलेली नाही. परंतु इस्लामिक स्टेट गटातील दहशतवाद्यांचा अफगाणिस्तानच्या शिया मुस्लिम अल्पसंख्यांकांवर हल्ला करण्याचा मोठा इतिहास आहे.
कुंदुज प्रांताचे पोलीस अधिकारी दोस्त मोहम्मद ओबैदा यांनी सांगितले की, स्फोटामध्ये अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. आत्मघातकी हल्लेखोर हा नमाजसाठी आलेल्यांच्या गर्दीत सहभागी होवून आला असण्याची शक्यता आहे.
दरम्यान याआधी 3 ऑक्टोबरला काबूलमधल्या एका मस्जिदीच्या बाहेर बॉम्ब स्फोट झाला होता. यात 5 अफगाण नागरिकांचा मृत्यू झाला होता. जबिहुल्ला मुजाहिद यांच्या आईच्या मृत्यूबद्ल शोक व्यक्त करण्यासाठी अनेक जण मशिदीत जमले होते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम