अहमदनगर Live24 टीम, 16 सप्टेंबर 2021 :- आंतरराष्ट्रीय देवस्थान शिर्डी संस्थानच्या अध्यक्षपदी कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांची तर उपाध्यक्षपदी जगदिश सावंत यांची निवड झाली आहे.
गेल्या अनेक महिन्यापासून प्रतीक्षेत असलेल्या शिर्डी संस्थानचे अध्यक्ष उपाध्यक्ष व विश्वस्त पदाची यादी आज राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे.
यामध्ये अध्यक्षपदी कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांची तर उपाध्यक्षदी जगदीश सावंत यांची निवड करण्यात आली आहे.
विश्वस्त म्हणून अनुराधा आदिक, सुहास आहेर, अविनाश दंडवते, सचिन गुजर, राहुल कनाल, सुरेश वाबळे,
जयंवतराव जाधव, महेंद्र शेळके, एकनाथ गोंदकर, तर शिर्डी नगरपंचायत अध्यक्षा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कोण आहेत आशुतोष काळे?
35 वर्षीय आशुतोष काळे हे अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार आहेत. माजी आमदार अशोकराव काळे यांचे ते पुत्र, तर माजी खासदार शंकरराव काळे यांचे ते नातू.
त्यांच्याकडे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्याही अध्यक्षपदाची धुरा आहे. आता त्यांची शिर्डी साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी लागली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम