Big Breaking : महाविकास आघाडी सरकार पडणार? एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे काही आमदार नॉट रिचेबल

Ahmednagarlive24 office
Published:

मुंबई : शिवसेनेचे (Shivsena) नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे विधान परिषदेचा निकाल लागल्यानंतर नाराज असल्याची चर्चा होत होती. एकनाथ शिंदे काही शिवसेनेच्या आमदारांसह नॉट रिचेबल येत आहेत. एकनाथ शिंदे सुरतमध्ये (Surat) एक हॉटेलमध्ये असल्याची माहिती मिळत आहे.

एकनाथ शिंदे हे गुजरातमधील सूरतच्या ग्रॅन्ड भगवती हॉटेलमध्ये (Grand bhagwati hotel) असल्याची माहिती समोर आली आहे. विधानपरिषदेच्या निकाल लागल्यानंतर ते कोणाच्याही संपर्कात नव्हते. आता एकनाथ शिंदे यांचा ठावठिकाणा लागला आहे.

आता सर्वांचे लक्ष एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाकडे लागले आहे. कारण आता महाराष्ट्रात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार कोसळणार की राहणार हाच प्रश्न सर्वांना पडला आहे.

शिवसेना अध्यक्ष आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे एकनाथ शिंदे आणि इतर ११ मंत्र्यांची मनधरणी करण्यात यशस्वी होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विधान परिषद निवडणुकीपूर्वी शिवसेनेचे दुसरे नेते आणि महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री यांच्यातील मतभेदाच्या बातम्या येऊ लागल्या. विधानपरिषदेच्या निकालानंतर मंत्री शिंदे पोहोचलेच नाहीत. शिवसेनेच्या आमदारांच्या मोठ्या गटात एकनाथ शिंदे यांचे वर्चस्व आहे.

ग्रॅन्ड भगवती हॉटेलचं नाव नुकतंच बदलून आता ली मेरिडिअन असं करण्यात आलं होतं. एकनाथ शिंदे यांच्यासोबत 11 आमदार सोबत असल्याची माहिती कळतेय. एकनाथ शिंदे नाराज असल्याचा कारणामुळे रात्रभर बैठकांचं सत्र सुरु आहे. मोठा राजकीय भूकंप होण्याची भीती व्यक्त केली जातेय.

एकनाथ शिंदे यांच्या सोबत असणाऱ्या आमदारांचा एकदा अजुणही नक्की समजू शकलेला नाही. उद्धव ठाकरे यांनी महत्वाची बैठक बोलावली आहे. आजच्या बैठकीला शिवसेनेचे किती आमदार पोहोचतात हे पाहावे लागेल.

कारण काही आमदारांनी सभा पुढे ढकलल्याने शिस्तीसाठी ओळखल्या जाणाऱ्या शिवसेनेत सर्व काही ठीक नाही हे स्पष्ट होणार आहे. भाजपला मते देणाऱ्या तीन आमदारांचा शोध घेणे हे उद्धव ठाकरेंसमोरील सर्वात मोठे आव्हान असेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe