Maharashtra news : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांनी सार्वजनिक कार्यक्रम टाळून घरीच विश्रांती घेतली.
त्यानंतर आता पुन्हा त्यांनी चाचणी करून पाहिली असता त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
त्यामुळे त्यांनी संपर्कात आलेल्या सर्वांना काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.मात्र, यामुळे आता त्यांना उद्यापासून सुरू होत असलेल्या विशेष अधिवेशनास उपस्थित राहता येणार नाही.
पूर्वी बहुतम चाचणीसाठी अधिवेशन बोलाविण्यात आले होते. त्यापूर्वीच त्यांना कोरोनाची लागण झाली होती.
मात्र, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्याने ते अधिवेशन झालेच नाही.
आता नव्या सरकारचे अधिवेशन होत आहे. त्यामध्ये अध्यक्ष निवड आणि बहुमत चाचणी असे महत्वाचे विषय होणार आहेत.
मात्र, यासाठी पवार उपस्थित राहू शकणार नाहीत.