शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासंबंधी न्यायालयाचा मोठा निर्णय

Published on -

Maharashtra News:मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा घेण्यास शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाला परवानगी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचा हस्तक्षेप अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला आहे.

उद्धव ठाकरे यांना शिवाजीपार्कवर सभा घेण्यास परवानगी न देण्याचा मुंबई महापालिकेचा निर्णय उच्च न्यायालयाकडून रद्द ठरविण्यात आला आहे. दादरच्या शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी शिवसेनेकडून दाखल करण्यात याचिकेवर शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली.

यावेळी शिवसेनेचे वकील अस्पी चिनॉय यांनी ठाकरे यांची बाजू मांडली. त्यांच्या या आरोपांचा मुंबई महानगरपालिकेचे वकील मिलिंद साठ्ये यांच्याकडून तितक्याच जोरकसपणे प्रतिवाद करण्यात आला.

महापालिकेने ठाकरे यांचा अर्ज फेटाळताना वापरलेली पद्धत चुकीची असल्याचे कोर्टाने म्हटले आहे. इतकी वर्ष हा मेळावा होत असताना कधीही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही. शिवाय शिवसेनेने त्याची हमी घेतली आहे. त्यामुळे या कारणावरून परवानगी नाकारणे पटत नसल्याचे कोर्टाने म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News