अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2022 Maharashtra News :- मागील आठवडाभरात कच्च्या तेलाच्या किंमती मोठी घसरण झाली असून हे दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे. दरम्यान तेलाचा भाव १०० डाॅलर खाली येईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
त्यामुळे कंपन्यांनी दरवाढीबाबत सावध भूमिका घेतली आहे. परिणामी पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला.

कमॉडिटी बाजारात सोमवारी ब्रेंट क्रूडचा भाव ३.६ टक्क्यांनी कमी झाला आणि तो १०८.५५ डॉलर प्रती बॅरल इतका झाला. यूएस डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव १०५.४० डाॅलर इतका झाला आहे. त्यात ३.९३ टक्के घसरण झाली. गेल्या सोमवारी कच्च्या तेलाचा भाव १३९.१३ डाॅलरपर्यंत वाढला होता. २००८ नंतरची ही तेलाची सर्वोच्च पातळी होती.
पेट्रोलचे दर
सोमवारी मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०९.९८ रुपयांवर स्थिर आहे.
दिल्लीत पेट्रोल ९५.४१ रुपये झाले आहे.
कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०४.६७ रुपयांवर स्थिर आहे.
चेन्नईत पेट्रोलचा भाव १०१.५१ रुपये इतका आहे.
भोपाळमध्ये पेट्रोलचा भाव १०७.२३ रुपये आहे.
डिझेलचे दर
एक लीटर डिझेलचा मुंबईत ९४.१४ रुपये भाव आहे.
दिल्लीत डिझेल ८६.६७ रुपयांवर कायम आहे.
चेन्नईत आज डिझेलचा भाव प्रती लीटर ९१.५३ रुपये इतका झाला.
कोलकात्यात मात्र डिझेलचा भाव ८९.७९ रुपयांवर कायम आहे.
भोपाळमध्ये डिझेलसाठी ९०.८७ रुपये दर आहे.
नोएडामध्ये आज एक लीटर डिझेल दर ८७.०१ रुपये आहे.
देशात सर्वात कमी दरात पेट्रोल आणि डिझेल दिल्लीजवळील नोएडा शहरात मिळत आहे. नोएडामध्ये आज एक लीटर पेट्रोलचा भाव ९५.५१ रुपये आहे.