Maharashtra Politics : काँग्रेसच्या G-23 या बंडखोर गटाचा प्रमुख भाग असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी मोठा निर्णय घेतला आहे.
त्यांनी काँग्रेस पक्ष सोडून समाजवादी पक्षाच्या मदतीने राज्यसभेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांनी आज लखनऊमध्ये जाऊन राज्यसभा निवडणुकीसाठीचा अर्ज भरला. आपण १६ मे रोजीच काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्याचे त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सांगितले.

कपिल सिब्बल गेल्या काही काळापासून ते पक्षाच्या ध्येयधोरणांवर नाराज होते. कपिल सिब्बल यांनी कोणालाही पत्ता लागून न देता काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
त्यांनी आता अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाची मदत घेऊन राज्यसभेवर जाणार आहेत. काँग्रेसमध्ये गांधी घराण्याऐवजी सामूहिक नेतृत्त्व असावे, हे मत त्यांनी अनेकदा बोलून दाखवले होते.
त्यामुळे पक्षातून त्यांच्याविरोधात नाराजीही होती. ते राज्यसभा निवडणूक कोठून लढविणार या बद्दल उत्सुकता होती. महाराष्ट्रातील नेतेही येथील जागा त्यांच्यासाठी सोडली जाते की काय, यामुळे धास्तावले होते. मात्र, सिब्बल यांनी अचानकपणे काँग्रेस सोडून समाजवादी पक्षातर्फे अर्ज दाखल केला.













