मोठी बातमी : न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान केल्याप्रकरणी ‘या’ जिल्हाधिकारी विरुद्ध अटक वॉरंट

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :-  न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान केल्याप्रकरणी बीडचे जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा विरोधात अटक वॉरंट बजावण्यात आला आहे.

शासकीय जमिनीवर करण्यात आलेले अतिक्रमण, नियमानुकूल करण्याबाबत ६ महिन्यात निर्णय घेण्याचे आदेश, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत.

या निर्णयाची, जिल्हाधिकाऱ्यांनी याची अंमलबजावणी केली नाही. यामुळे या संदर्भात न्यायालयाचा अवमान केल्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली होते.

सदर, प्रकरणात न्यायमूर्ती एस.बी. गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती आर.एन.लड्डा यांच्या पीठाने, बीडचे जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा यांच्या विरोधात अटक वॉरंट बजावले आहे.

त्यांना अटक करून १० हजाराच्या जामिनावर मुक्त करावे आणि १८ जानेवारी दिवशी न्यायालयासमोर हजर होण्यास सांगावे, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.

जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या विरोधात अटक वॉरंट आल्यामुळे, आता चर्चेला उधाण आले आहे.

थेट जिल्ह्याधिकाऱ्याविरुद्ध अटक वॉरंट बजावण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांना अटक होणार का? या कडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.