मोठी बातमी ! रद्द आरोग्य विभागाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 27 सप्टेंबर 2021 :-  आरोग्य विभागाच्या गट क व गट ड पदाची परीक्षा २५ आणि २६ सप्टेंबर रोजी घेतली जाणार होती. मात्र ही परीक्षा आदल्या दिवशी रात्री स्थगित करण्यात आली.

यामुळं अनेक विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला. मात्र झालेल्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. त्यामध्ये 24 ऑक्टोबर गट क ची परीक्षा तर गट ड साठी 31 ऑक्टोबर रोजी परीक्षा घेण्याचा निर्णय झाल्याची माहिती माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

या दोन्ही दिवशी रविवार असल्यानं शाळा उपलब्ध होतील, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. परीक्षेच्या तयारीसाठी डॅशबोर्ड द्यावा, परीक्षा केंद्रांची माहिती, उपलब्ध शाळांची माहिती 1 ऑक्टोबरपर्यंत द्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

राजेश टोपे यांनी यावेळी 9 दिवस आधी हॉलतिकीट दिले जाईल, अशी देखील माहिती दिली. विद्यार्थ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नका कुठलेही चुकीचे काम होऊ देणार नाही, असं म्हटलं.

कुणीही काहीही चुकीच्या गैर मार्गाचा अवलंब करण्याचा प्रयत्न केला तर संबंधित विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी पोलीस स्टेशनला तक्रार करावी. परीक्षा पारदर्शकचं व्हाव्यात काही असेल तर तातडीने पोलिसात तक्रार नोंदवा, असं आवाहन राजेश टोपे यांनी केलं.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News