BIG NEWS : मुख्यमंत्री ठाकरे आजच राजीनामा देण्याची शक्यता

Published on -

Maharashtra Politics : बहुतमत चाचणी सिद्ध करण्याच्या अधिवेशनाला सामोरे जाण्याआधीच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राजीनामा देण्याचे ठरविले असल्याचे सांगण्यात येते.

सायंकाळी होणाऱ्या सुनावणीचा निकाल काहीही लागला, तरी आज सायंकाळीच राजीनामा द्यायचा, असा त्यांचा विचार असल्याचे समजते.माझी माणसं माझ्याविरोधात गेल्याचे मी बघू शकणार नाही, अशी त्यांची भावना असल्याचे सांगण्यात येत.

तर दुसरीकडे मतांचे आकडेही आणखी घटत आहेत. शिवसेनेचा फुटलेला गट एकनाथ शिंदे यांच्यासोबत ठाम आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसची चार मते कमी झाली आहेत. नवाब मलिक आणि अनिल देशमुख तुरुंगात आहेत.

तर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि मंत्री छगन भुजबळ कोरोना झाल्याने अधिवेशनाला उपस्थित राहू शकणार नाहीत. एकूण परिस्थिती लक्षात घेता सभागृहात नाचक्की होण्यापेक्षा किंवा निकालानंतरही आजची शक्यता उद्यावर पडण्यापेक्षा आता राजीनामा देऊन मोकळे व्हावे, असा विचार ठाकरे करत असल्याचे सांगण्यात येते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe