अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2021 :- येत्या २ जानेवारी रोजी राज्यभर होऊ घातलेल्या एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोग पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचा निर्णय आयोगामार्फत जाहीर करण्यात आला आहे.(MPSC Exam Postponed)
राज्य सेवा पूर्व परीक्षा 2021 करीता वयाधिक ठरलेल्या उमेदवारांना दिनांक 17 डिसेंबर 2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार परीक्षेची संधी उपलब्ध व्हावी,

याकरिता दिनांक 2 जानेवारी 2022 रोजी नियोजित प्रस्तुत परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. कोरोनामुळे मागील वर्षी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा झाली नाही.
त्यामुळे ज्यांची वयोमर्यादा मागील वर्षी संपत होती ते विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकले नव्हते. सरकारने आणि आयोगाने अशा विद्यार्थ्यांना आणखीन एक वर्ष ही परीक्षा देण्याची संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला परिक्षा नव्याने राबवावी लागणार आहे. मागील वर्षी शेवटची संधी असलेल्या विद्यार्थ्यांना यावर्षीच्या परिक्षा प्रक्रियेत सहभागी करून घ्यावे लागणार आहे.
त्यामुळे दोन जानेवारीला होणारी ही परीक्षा पुढं ढकलण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. परीक्षेचं नवं वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल असं आयोगने म्हटलं आहे. पोलीस उपअधीक्षक, उपजिल्हाधिकारी , तहसीलदार अशा 390 पदांसाठी ही परीक्षा घेण्यात येणार होती.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम