Bank Rules : नवीन वर्षाचे काही दिवस होत नाही तोपर्यंत बँकेकडून ग्राहकांसाठी एक निराशाजनक बातमी आली आहे. बँकेच्या एका निर्णयामुळे ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागणार असल्याने ग्राहकांच्या खिशावर आर्थिक बोजा पडणार आहे.
बँक ऑफ बडोदाने व्याजदरात वाढ केली आहे. त्यामुळे बँक ऑफ बडोदा बँकेच्या ग्राहकांना मोठा धक्का मानला जात आहे. बँक ऑफ बडोदा (BoB) ने मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) 0.35 टक्क्यांनी वाढवला आहे.

१२ जानेवारीपासून हे नवीन व्याजदर लागू होणार आहे. तसेच इतर बँकांकडूनही वैयक्तिक व्याजदरात वाढ केल्याने ग्राहकांच्या कर्जावर त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे ग्राहकांना कर्जाची रक्कम भरत असताना जास्तीचे पैसे द्यावे लागणार आहेत.
2.25 टक्क्यांनी वाढला रेपो रेट
एक दिवसाचा MCLR 7.50 वरून 7.85 टक्के करण्यात आला आहे. त्याच वेळी, एक महिना, तीन महिने, सहा महिने आणि एक वर्षासाठी MCLR 0.20 टक्क्यांनी वाढवून अनुक्रमे 8.15 टक्के, 8.25 टक्के, 8.35 टक्के आणि 8.50 टक्के करण्यात आला आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने गेल्या वर्षी मे पासून मुख्य धोरण दर रेपो दरात 2.25 टक्क्यांनी वाढ केली. रेपो दरात शेवटची 7 डिसेंबर 2022 रोजी 0.35 टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती.
दुसरीकडे, इंडियन ओव्हरसीज बँक (IOB) ने EFI ठेवींवरील व्याजदरात 0.45 टक्क्यांपर्यंत बदल केला आहे. हा बदल लागू करण्यात आला आहे. IOB ने एका निवेदनात म्हटले आहे की यासह, घरगुती, NRO आणि NRE (अनिवासी बाहेरील) यांना आता 444 दिवसांच्या ठेवींवर 7.75 टक्के व्याज मिळेल. परकीय चलन ठेवींवरील व्याजातही एक टक्का वाढ करण्यात आली आहे.