मोठी बातमी ! खाजगी कार्यालयांसाठी सरकारनं जारी केला महत्त्वाचा निर्णय

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:-राज्यात कोरोनाचा धोका वाढू लागल्याने राज्य सरकारने कठोर पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे. हॉटेल, मंगल कार्यालयांवर निर्बंध आणल्यानंतर आज राज्य सरकारने नवीन नियमावली जारी करीत खाजगी कार्यालयांवर निर्बंध घातले आहेत.

जाणून घ्या काय आहे नव्या गाईडलाईन्स? :-

  • राज्यातील सर्व खासगी कार्यालये व आस्थापनांमध्ये (आरोग्य, मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र वगळून) 50 टक्के कर्मचारी उपस्थितीची परवानगी.
  • सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांच्या प्रमुखांनी त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती किती ठेवायची ते निश्चित करावे.
  • तर प्रत्येक कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर तापमान तपासण्यात येईल, तर मास्क असल्याशिवाय प्रवेश नाही. त्याचबरोबर सॅनिटायझर बंधनकारक करण्यात आले आहे.
  • नाट्यगृहे व सभागृहे यामधील उपस्थिती 50 टक्के असावी. तसेच त्यांचा उपयोग धार्मिक, राजकीय मेळावे यासाठी करता येणार नाही.
  • शासनाने काढलेला हा आदेश 31 मार्च पर्यंत अंमलात येणार असून त्यानंतर पुढील आदेश निर्गमित करण्यात येणार आहेत.
  • दरम्यान, कोविडचा वाढत प्रादुर्भाव पाहता मिशन बिगीन अंतर्गत राज्यात नव्या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत.
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News