Big News : पाकिस्तानी नौदलाने (Pakistani Navy) ग्वादरजवळ (Gwadar) जमना सागर (Jamna Sagar) या भारतीय जहाजातून 9 मच्छिमारांची (fishermen) सुखरूप सुटका केली आहे.
10 क्रू मेंबर्ससह हे जहाज अरबी समुद्रात (Arabian Sea) बुडाले. जहाज बुडत असताना मदतीसाठी विनंती केली. त्यानंतर पाकिस्तान (Pakistan) सागरी माहिती केंद्राने जवळच्या व्यापारी जहाज एमटी क्रुइबेकेला बुडणाऱ्या जहाजाच्या अडकलेल्या कर्मचाऱ्यांना आवश्यक मदत पुरवण्याची विनंती केली.

या व्यापारी जहाजाने जमना सागरमधील 9 क्रू मेंबर्सची सुखरूप सुटका केली. जहाजाने सुटका केलेल्या भारतीय नागरिकांना दुबई बंदरात पुढील मुक्कामावर नेले, जिथे त्यांना सुरक्षितपणे उतरवण्यात आले आहे.
पाकिस्तानी नौदलाने एक मृतदेह ताब्यात घेतला
पाकिस्तानी नौदलानेही आपले एक जहाज आणि दोन हेलिकॉप्टर त्या भागात शोध आणि बचाव मोहिमेसाठी पाठवले आहेत. जहाज बुडाल्यानंतर बेपत्ता झालेल्या क्रू मेंबरचा मृतदेह टीमने बाहेर काढला. पुढील कारवाईसाठी मृतदेह पाकिस्तान सागरी सुरक्षा एजन्सीच्या (PMSA) अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आला आहे.
कारवाई पूर्ण झाल्यानंतर मृतदेह भारतीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिला जाईल, असा दावा पाकिस्तानी माध्यमांनी केला आहे. या मोहिमेबाबत पाकिस्तानी नौदल आपल्या भारतीय समकक्षांच्या संपर्कात आहे.
व्यापारी जहाज बुडाल्याचे कारण समजू शकले नाही
ग्वादरजवळ जहाज कसे बुडाले हे अद्याप समजू शकलेले नाही. जहाजातील कर्मचाऱ्यांची चौकशी केल्यानंतरच या घटनेचे कारण समोर येईल.
पाकिस्तानच्या हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी ग्वादरच्या आसपासचे हवामान चांगले होते. समुद्रातील लाटाही सामान्य होत्या. अशा परिस्थितीत, बुडण्याच्या कारणांपैकी खराब हवामानाची शक्यता खूपच कमी आहे.