भारी बातमी ! भारतात लॉन्च होतेय Mahindra Scorpio N Pickup Truck , फिचर्स व किंमत पाहून….

Published on -

महिंद्रा ही वाहन सेक्टरमधील सुप्रसिद्ध कंपनी आहे. आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या वाहने बनवण्यासाठी ही कंपनी लोकप्रिय आहे. या कंपनीच्या वाहनांना मोठी डिमांड मार्केटमध्ये आहे. आता ही कंपनी लवकरच भारतामध्ये Mahindra Scorpio N Pickup ट्रक लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.

यात फ्रंटला एलईडी डीआरएल सह एलईडी हेडलाइट क्लस्टर आणि ड्रायव्हरच्या बाजूला स्नॉर्केलसह नवीन डिझाइन केलेले ग्रिल आहेत. छतावर एलईडी लाइट बार सेटअप देखील आहे. पिकअप ट्रकची अलॉय व्हील्स, फ्रंट बंपर-माउंटेड विंच आणि साइड स्टेप्स हे देखील शानदार आहे.

असे आहे शानदार केबिन :-पिकअप ट्रक असल्याने यात मागील बाजूला जंप सीट दिलेल्या नाहीत. पाठीमागे मोठी खुली स्पेस असेल. ही केबिन महिंद्रा स्कॉर्पिओ एन सारखीच असेल. थोडेफार बदल दिसू शकतात. प्रॉडक्शन मॉडेल येईपर्यंत त्याच्या केबिनमध्ये बरेच बदल दिसतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

Scorpio N Pickup Truck मध्ये काय असू शकतात फीचर्स ? :-Scorpio N Pickup Truck मध्ये नॉर्मल स्कॉर्पिओ एन सारखेच फीचर्स मिळणार आहेत. ८ इंचाची टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम सिम्युलेटर इंस्ट्रुमेंट क्लस्टर आणि वायरलेस अँड्रॉइड ऑटोसह अॅपल कारप्ले कनेक्टिव्हिटीसह येते. ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल, वायरलेस मोबाइल चार्जिंग, अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, सिंगल पेन व्हॉइस असिस्ट सनरूफ, मागच्या प्रवाशांसाठी एसी व्हेंट आणि यूएसबी चार्जिंग सॉकेट आदी फीचर्स यात मिळतील.

आता जाणून घेऊयात सेफ्टी फीचर्स:-सिक्युरिटी फीचरसाठी यात सहा एअरबॅग, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिम, हिल होल असिस्ट, हिल डिसेंट कंट्रोल, ट्रॅक्शन कंट्रोल आदी सुविधा उपलब्ध असतील.

इंजिन बाबत माहिती जाणून घेऊयात –बोनेटखाली 2.2 लीटर डिझेल इंजिन असेल. याबाबत अद्याप कोणतीही जास्त माहिती देण्यात आलेली नाही. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, यात 4-लीटर इंजिन ऑप्शनदेखील दिले जाऊ शकते.

किती असेल किंमत व कधी होईल लॉन्च ?:-याचे किंमत २५ लाख रुपयांपासून सुरू होण्याची शक्यता आहे. महिंद्राने हे कधी लाँच होणार याचा खुलासा केलेला नाही. परंतु 2026 पर्यंत ते भारतीय बाजारपेठेत लॉन्च केले जाऊ शकते असा अंदाज आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News