मोठी बातमी! दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइनच होणार

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, , 03 फेब्रुवारी 2022 :-  दहावी आणि बारावीच्या परीक्षा आधी नियोजित वेळेनुसार ऑफलाइन पद्धतीनेच होणार असल्याचे राज्य माध्यमिक आणि मंडळाने आज पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले आहे.

दहावीची लेखी ऑफलाइन परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान होणार आहे. त्याची तोंडी परीक्षा २५ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२२ दरम्यान होणार आहे.

तर बारावीची लेखी परीक्षा ४ ते ३० मार्च दरम्यान होणार असून १४ ते ४ मार्च तोंडी परीक्षा होईल अशी माहिती शरद गोसावी यांनी दिली आहे.

ज्या विद्यार्थ्यांना काही कारणास्तव परीक्षा देता येणार नाही त्यांना ३१ मार्च ते १८ एप्रिल या कालावधीत पुन्हा परीक्षा देता येईल, असेही गोसावी यांनी स्पष्ट केले.

यंदा दहावीची परीक्षा १५ मार्च २०२२ पासून सुरू होणार आहे आणि ४ एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. ४० ते ६० गुणांच्या पेपरसाठी अतिरिक्त १५ मिनिटे आणि ७० ते १०० गुणांच्या पेपरसाठी अतिरिक्त ३० मिनिटांचा वेळ देण्यात येणार आहे.

दरम्यान दहावीसाठी १६ लाख २५ हजार ३११ आवेदन पत्रं मिळाली असून बारावीसाठी १४ लाक ७२ हजार ५६५ आवेदन पत्रं प्राप्त झाली आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe