शिकाऊ विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी, ‘हे’ पार्ट टाइम जॉब्स दिवसाला देतील 6000 पेक्षाही अधिक कमाई 

विद्यार्थी जीवनात शिक्षणासोबतच स्वतःच्या खर्चासाठी किंवा अनुभवासाठी पार्ट टाईम नोकरी करण्याकडे अनेकांचे लक्ष जाते. पार्ट टाइम जॉब शोधणाऱ्यांसाठी आता एक मोठी संधी निर्माण झाली आहे. यबाबत अधिक जाणून घेऊयात-

Published on -

Part-Time Jobs | अनेक जण शिक्षणासोबतच स्वतःच्या खर्चासाठी किंवा अनुभवासाठी पार्ट टाईम नोकरी शोधत असतात. विशेषतः परदेशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकता शिकता कमावण्याची गरज असतेच. अमेरिकेसारख्या देशात विद्यार्थी व्हिसावर आठवड्याला 20 तास काम करण्याची मुभा असते. अशा वेळी योग्य नोकरी निवडणे गरजेचे ठरते. काही जॉब्स हे केवळ कमाईसाठीच नाही, तर ज्ञान, कौशल्य आणि बायोडेटामध्ये मूल्यवर्धन करणारे ठरतात.

टीचर असिस्टंट

टीचर असिस्टंट म्हणून काम करणे हे एक बौद्धिकदृष्ट्या समृद्ध करणारे काम असते. यात प्राध्यापकांना सहाय्य करणे, सेमिनार आयोजित करणे आणि विषय अधिक खोलवर समजून घेणे या गोष्टींचा समावेश असतो. यामुळे रोज सुमारे 3,000 ते 5,000 रुपये कमावता येतात.

प्रोडक्शन असिस्टंट

तुम्हाला आयोजन, इव्हेंट मॅनेजमेंट आणि नेटवर्किंगची आवड असेल, तर प्रोडक्शन असिस्टंट ही भूमिका परफेक्ट आहे. कॉलेज कॅम्पसवर विविध कार्यक्रम आयोजित करताना नेतृत्वगुणही विकसित होतात. यामधून दररोज 4,000 ते 6,000 रुपये मिळू शकतात.

लायब्ररी असिस्टंट

ग्रंथालयाची शांतता आणि पुस्तकांची सोबत हवी असेल, तर लायब्ररी असिस्टंट म्हणून काम करता येईल. यात पुस्तकांचे व्यवस्थापन, विद्यार्थ्यांना मदत करणे आणि काही वेळा इव्हेंट्समध्ये सहभाग घेणे अपेक्षित असते. कमाई अंदाजे 2,000 ते 4,000 रुपये दररोज होते.

ट्यूटर

जर एखाद्या विषयावर तुमची चांगली पकड असेल, तर ट्यूटर होणे हे उत्तम ठरेल. विद्यार्थ्यांना शिकवणे, स्टडी मटेरियल तयार करणे आणि मार्गदर्शन करणे ही कामे यात अपेक्षित असतात. ही नोकरी सर्वाधिक कमाई देणारी ठरते – दिवसाला 5,000 ते 7,000 रुपये तुम्हाला मिळू शकतात.

या सर्व पर्यायांमुळे विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊ शकतात आणि व्यावसायिक अनुभवही मिळवू शकतात. परदेशात शिकताना शिक्षणासोबत अनुभवाची भर टाकायची असेल, तर हे पार्ट टाईम जॉब्स अत्यंत उपयुक्त ठरतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News