Petrol Price: पेट्रोल डिझेलच्या (petrol diesel) वाढत्या महागाईपासून आता सर्वसामान्यांना (common people) दिलासा मिळू शकतो. जगभरात इंधनाच्या किमती सातत्याने वाढत आहेत. पण आगामी काळात भारताला (India) चांगली बातमी मिळू शकते. खरे तर कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण होण्याची शक्यता सिटीग्रुपने (Citigroup) वर्तवली आहे.
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार!
सिटीग्रुपने म्हटले आहे की 2022 च्या अखेरीस कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल $ 65 पर्यंत घसरू शकते. असे झाल्यास 2023 च्या अखेरीस इंधनाची किंमत प्रति बॅरल $ 45 पर्यंत घसरू शकते. सध्या कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 105 डॉलर आहे जी 58 टक्क्यांनी खाली येऊ शकते.
सिटीग्रुपने दिलेल्या माहितीनुसार, ‘जागतिक मंदीमुळे कच्च्या तेलाच्या मागणीत मोठी घट होऊ शकते. असं असलं तरी, कच्च्या तेलाच्या किमतींचा इतिहास पाहिला तर, जागतिक अर्थव्यवस्थेवर संकट आले असताना, कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे.
कच्च्या तेलाच्या किमती खाली येतील
2008 मध्ये जेव्हा मंदी आली तेव्हा कच्चे तेल प्रति बॅरल $149 वरून $35 पर्यंत घसरले होते. यानंतर, कोविड-19 महामारीच्या काळातही जगभरातील लॉकडाऊनमुळे कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 20 डॉलरपर्यंत घसरली होती.
याआधी मंगळवारी आर्थिक संकट आणि मंदीमुळे अमेरिकेत कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 100 डॉलरपर्यंत खाली आली होती. म्हणजेच जेव्हा जेव्हा मंदी असते तेव्हा मागणी कमी झाल्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत घट होते.
भारताला होणार मोठा फायदा!
मात्र, कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या तर भारतासाठी सर्वात चांगली बातमी असेल. खरं तर, भारत आपल्या कच्च्या तेलाच्या वापरापैकी 80 टक्के आयात करतो आणि परकीय चलनाच्या साठ्यातून सर्वाधिक खर्च कच्च्या तेलाच्या आयातीवर होतो.
म्हणजेच कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या तर सर्वसामान्यांना इथे स्वस्तात पेट्रोल आणि डिझेल मिळेल त्याचबरोबर परकीय चलनाची गंगाजळीही वाचेल सरकारची आर्थिक तूटही कमी होईल.