Gold Price Update : सध्या देशात सर्वच वस्तूंच्या किमती खूप महाग झाल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. अशातच आता सर्वसामान्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे.
लग्न समारंभाच्या हंगामात सोने सुमारे 2263 रुपयांनी स्वस्त झाले आहे. त्यामुळे ग्राहकांना आता 10 ग्रॅम सोने 31553 रुपयांना खरेदी करता येणार आहे. त्यामुळे सोने खरेदीची ही उत्तम संधी आहे.
आज जाहीर होणार दर
नवीन व्यावसायिक सप्ताह आजपासून सुरू होत असून याआधी सराफा बाजारात सोन्याबरोबरच गेल्या व्यवहारी सप्ताहात चांदीच्या दरातही नरमाई दिसून आली होती. त्यामुळे आज नव्या व्यावसायिक आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोने-चांदीच्या दराकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.
शुक्रवारी होता हा दर
व्यापार आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोने 53937 रुपये प्रति 10 ग्रॅम तर चांदी 66131 रुपये प्रति किलोवर बंद झाली.
त्याचबरोबर चांदीच्या दरातही 773 रुपयांनी वाढून 66131 रुपये प्रति किलोवर बंद झाली. तर गुरुवारी चांदीचा दर 640 रुपयांच्या वाढीसह 65358 रुपये प्रति किलोच्या पातळीवर बंद झाला.
नवीन 14 ते 24 कॅरेट सोन्याची किंमत
शुक्रवारी 24 कॅरेट सोने 157 रुपयांनी महागून 53,937 रुपये, 23 कॅरेट सोने 156 रुपयांनी महागून 53,721 रुपये तर 22 कॅरेट सोने 133 रुपयांनी 49,406 रुपये, 18 कॅरेट सोने 118 रुपयांनी महागून 45, 30 रुपये झाले. त्याचबरोबर 14 कॅरेट सोने 92 रुपयांनी महागले आणि 31553 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले.
सोने 2200 रुपयांनी तर चांदी 13800 रुपयांनी स्वस्त
सोने सध्या 2263 रुपये प्रति 10 ग्रॅमने त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकापेक्षा स्वस्त विकले जात असून ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने सार्वकालिक उच्चांक गाठला. तेव्हा सोन्याचे दर 56200 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता. तर, चांदी 13849 रुपये प्रति किलो दराने त्याच्या सर्वोच्च पातळीपेक्षा स्वस्त होत आहे. चांदीचा आतापर्यंतचा उच्चांक 79980 रुपये प्रति किलो इतका आहे.
खरेदीत दिरंगाई करू नका
सोने आणि चांदीच्या भावातील वाढीचा टप्पा येत्या काळातही कायम राहणार असून नवीन वर्ष 2023 मध्ये लवकरच सोन्याची किंमत सर्वोच्च पातळीच्या जवळ किंवा त्यापलीकडे पोहोचेल.
त्यामुळे तुम्हाला सोने खरेदी करायचे असेल तर लवकरात लवकर खरेदी करा.लग्नाच्या हंगामात सोन्या-चांदीच्या किमतीतील चढ-उतार सुरू असतात. त्यामुळे लग्नसराईच्या काळात सोने आणि चांदी खरेदी करणे योग्य ठरेल.
मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या किंमत
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. थोड्याच वेळात एसएमएसद्वारे देखील दर समजू शकतील. त्याशिवाय तुम्ही सतत अपडेट्ससाठी http://www.ibja.co किंवा http://ibjarates.comला भेट देऊ शकता.
अशा प्रकारे तपासा शुद्धता
जर तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल, तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. ग्राहक बीआयएस केअर अॅपद्वारे सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्याच्याशी संबंधित कोणतीही तक्रारही दाखल करू शकता.
24 कॅरेट सोने असते सर्वात शुद्ध
24 कॅरेट सोने सर्वात शुद्ध मानले जाते, परंतु या सोन्यापासून दागिने बनवता येत नाहीत कारण ते खूप मऊ असते. त्यामुळे दागिने बनवण्यासाठी बहुतेक 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. 24 कॅरेट सोने 99.9 टक्के शुद्ध आणि 22 कॅरेट सुमारे 91 टक्के शुद्ध आहे.
22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात, बहुतांश दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.