अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2022 Ahmednagarlive24 :- कोरोना निर्बंधांसंबंधी सर्वांत मोठी बातमी हाती आली आहे. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून वेळोवेळी लादण्यात आलेले सर्व निर्बंध आता मागे घेण्यात येत आहेत.
फक्त सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंग हे नियम कायम ठेवण्यात आले आहेत. अर्थात स्थानिक प्रशासनाला परिस्थितीनुरूप निर्णय घेण्याचे अधिकार कायम ठेवण्यात आले आहेत.
तब्बल दोन वर्षे विविध प्रकारचे निर्बंध होते. आता ३१ मार्चपासून ते सर्व हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
गेल्या काही काळापासून देशात करोनाचा तिसरी लाट ओसरली आहे. रुग्णसंख्या झपाट्याने कमी झाली आहे. तरीही विविध निर्बंधांना नागरिकांना समारे जावे लागत होते.
आता ते मागे घेण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला. चीनसह अन्य काही देशांत कोरोनाचे रुग्ण वाढत असताना आपल्या देशात घेतलेला हा निर्णय धाडसी मानला जात आहे.