अहमदनगर मध्ये वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

Published on -

Ahmednagar News:अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. विनायक पोपट आवारे (रा. उंबरे ता. राहुरी) असे मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे.

निंबळक (ता. नगर) शिवारात चौधरी धाब्याजवळ ही घटना घडली. याप्रकरणी राहुल विनायक आवारे (वय २८) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात वाहन चालकाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

२६ जुलै रोजी विनायक आवारे त्यांच्या दुचाकीवरून निंबळक बायपास रोडने जात असताना चौधरी धाब्यासमोर त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडकेत त्यांचा मृत्यू झाला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe