लवकरच सौरभ गांगुलीवर येणार बायोपिक

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :- बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिकची मोठी चलती आहे. त्यातल्या त्यात क्रिकेटर्सच्या आयुष्यावर अनेक बायोपिक तयार होतं आहेत.

महेंद्रसिंग धोनी आणि सचिन तेंडुलकर यांच्या बायोपिकच्या प्रचंड यशानंतर आत्ता अनेक क्रिकेटर्सच्या आयुष्यावर आधारित बयोपिक येत आहेत. त्यामध्ये कपिल देव, मिताली राज यांचा समावेश आहे.

यामध्ये आत्ता क्रिकेटर सौरभ गांगुलीचासुद्धा समावेश झाला आहे. लवकरच दादाच्या आयुष्यावर बायोपिक तयार होणार आहे. क्रिकेटर सौरभ गांगुलीवर आधारित बायोपिकला आत्ता ग्रीन सिग्नल मिळाला आहे.

यामध्ये कोणता अभिनेता सौरभची भूमिका साकारणार आहे, याबद्दल अधिकृत माहिती मिळालेली नाहीय. मात्र माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार यामध्ये अभिनेता रणबीर कपूर सौरभच्या भूमिकेत दिसू शकतो.

एका मुलाखती दरम्यान सौरभने म्हटलं होतं की त्याला हृतिक रोशन खूप आवडतो. तेव्हा पासून असा अंदाज बांधण्यात येत होता, की हृतिक दादाच्या भूमिकेत दिसून येईल. सूत्रांच्या माहितीनुसार या चित्रपटासाठी स्क्रिप्टसुद्धा लिहिण्यात येत आहे.

सौरभची प्रोडक्शन हाउससोबत अनेक मिटिंगदेखील झाल्या आहेत. अभिनेत्याचं नावदेखील जवळजवळ निश्चितचं झालं आहे. यामध्ये रणबीर कपूर सर्वात वर आहे. या लिस्टमध्ये आणखी दोन अभिनेत्यांचं नावदेखील आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe