अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:-डिजिटल करन्सी गुंतवणूकदारांमध्ये अधिक लोकप्रिय होत असल्यानेच बिटकॉईनमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाल्याचे दिसून आले आहे.
मंगळवारी पहिल्यांदाच ५० हजार डॉलरचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला असून, भारतीय चलनात एका बिटकॉईनचे मूल ३६ लाख रुपयांवर गेले आहे. सोने, शेअर्स, स्थावर मालमत्ता यासारख्या गुंतवणुकीबरोबरच बिटकॉईनलाही पसंती मिळत आहे.
आभासी चलन असलेल्या बिटकॉईनमध्ये मागील २ महिन्यांत जवळपास १५० टक्के वाढ झाली असून, मार्च महिन्यात बिटकॉईनचे मूल्य ५ हजार डॉलर्सच्या आसपास होते.
बिटकॉईनने २० हजार डॉलरचा टप्पा १६ डिसेंबर रोजी ओलांडला होता. न्यूयॉर्कमध्ये ५० हजार १९१ डॉलर मूल्य, तर भारतात ३६ लाख ४४ हजार ११३ रुपये इतके नोंदवण्यात आले आहे.
तर बिटकॉईनच्या मूल्यात वाढ झाल्याने कोरोना संकटात सोने दरात होत असलेली घसरण आणि अस्थिरता यामुळे गुंतवणूकदारांनी आपला मोर्चा बिटकॉईनकडे वळवला होता.
जगभरातील केंद्रीय बँकांचे शून्य व्याजदराला प्राधान्य, वर्षभरात बिटकॉईनमध्ये ४०० टक्के तेजी, कमॉडिटी आणि भांडवली बाजारातील अस्थिरता, टेस्ला कंपनीचे प्रमुख ॲलन मस्क यांच्याकडून १.५ अब्ज डॉलर्सची बिटकॉईनमध्ये
गुंतवणूक तसेच मास्टरकार्ड आणि बँक ऑफ न्यूयॉर्क मेलोन कॉर्पे यांनी क्रिप्टोकरन्सी वापरण्यासाठी उचललेली पाऊले यामुळे जगभरात बिटकॉईनचा भाव वाढल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे.
- ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम ।
- © Copyright 2021, all rights reserved