भाजपला तीन राज्यात भोपळाही फोडता आला नाही, पक्षासाठी ही कोणतीही मोठी लाट किंवा वादळ नाही -अमोल मिटकरी

Content Team
Published:

मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या (Assembly elections) निकालानंतर पाच राज्यात मोदी लाट कायम असल्याचे समजत आहे. परंतु राष्ट्रवादी (Ncp) विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी हा दावा फेटाळून लावत पाच राज्यांव्यतिरिक्त इतर विधानसभांमध्ये भाजपची (Bjp) परिस्थिती खुपच वाईट असल्याचे सांगितले आहे.

यावेळी मिटकरी म्हणाले की, २९ राज्यांपैकी केवळ १० राज्य विधानसभामध्येच भाजपला स्पष्ट बहुमत आहे, त्यापैकी तीन राज्यांमध्ये भाजपला भोपळाही फोडता आला नाही, तर सहा राज्यांमध्ये भाजप एक अंकी जागांवरच आहे. ज्या ठिकाणी भाजपाचे युतीचे सरकार आहे, अशा चार राज्यांमध्येही भाजपला अल्प प्रमाणात जागा मिळाल्या आहेत.

त्यामुळे भाजपची कोणतीही लाट किंवा वादळ नाही, खरंतर भाजपचा देशात ६६% जागांवर पराभूत झाला आहे, अशी टीका आमदार अमोल मिटकरी यांनी यावेळी केली आहे.

तसेच अमोल मिटकरी यांनी दाखवलेल्या आकडेवारीनुसार २९ पैकी केवळ १० राज्यांच्या विधानसभांमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत आहे. यामध्ये उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), उत्तराखंड, गोवा, मणिपूर, गुजरात, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, आसाम, त्रिपुरा या राज्यांचा समावेश आहे.

तर सिक्कीम, मिझोराम, तामिळनाडूमध्ये भाजपला एकही जागा जिंकता आली नाही. असा खोचक टोला आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपला लगावला आहे.

देशातील एकूण ४,१३९ विधानसभा जागांपैकी भाजपकडे १,५१६ जागा आहेत. त्यापैकी ९५० जागा गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान या ६ राज्यांतील आहेत.

याचा अर्थ स्पष्ट आहे, की भाजपची कोणतीही लाट किंवा वादळ नाही, प्रत्यक्षात देशात ६६% जागांवर भाजपचा पराभव झाला आहे, असेही मिटकरी यांनी यावेळी स्पष्ठ केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe