Maharashtra News : सरकार बदलेल की आधीच्या सरकारचे निर्णय बदलेले जातात. तत्कालीन महाविकास आघाडीच्या सरकारनेही आधीच्या भाजपच्या सरकारचे अनेक निर्णय फिरविले होते, अनेक योजना रद्द केल्या होत्या.
एवढेच काय त्यांची चौकशीही सुरू केली होती. अशीच एक एक योजना म्हणजे जलयुक्त शिवार योजना. ती योजना परत आणण्याचा निर्णय नव्या सरकारच्या पहिल्याच बैठकीत घेण्यात आला.तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील ही महात्वाकांक्षी योजना होती.

त्यांनी त्यांचे विश्वासू सहकारी नगर जिल्यातील तत्कालीन मंत्री राम शिंदे यांच्याकडे हे खाते सोपविले होते. मात्र, सरकार बदलताच नव्या सरकारने ती रद्द तर केलीच उलट चौकशीही सुरू केली.
आता कालच फडणवीस यांनी पुन्हा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर पहिल्याच बैठकीत या योजनेला पुन्हा गती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या योजनेसह आणखी काही योजना पुन्हा सुरू होण्याच्या आणि ठाकरे यांच्या काळातील योजना रद्द किंवा त्यांची चौकशी सुरू होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.