Maharashtra News:भाजपच्या आमदार आणि पुणे शहराच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांचे दीर्घ आजाराने आज निधन झाले आहे.
त्या 57 वर्षाच्या होत्या. गेल्याकाही वर्षांपासून त्या कॅन्सरशी झुंज देत होत्या. अखेर त्यांची आज प्राणज्योत मालवली. मुक्ता टिळक यांनी पुण्याचे महापौर पदही भूषवले होते. त्यांच्या निधनाच्या बातमीने पुणे शहरासह जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

मुक्ता टिळक या 2017 ते 2019 या काळात पुण्याचे महापौरपद भूषवले होते. मुक्ता टिळक या बाळ गंगाधर टिळक यांचे नातू जयंतराव टिळक यांच्या सूनबाई आहेत.