काँग्रेसने ७०वर्षांत निर्माण केलेल्या संस्था भाजपाने सात वर्षात विकायला काढल्या…

Ahmednagarlive24 office
Updated:

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :-  सातत्याने खोटं बोलण्याने समाजाला ते खरे वाटू लागते आणि लोक त्यावर विश्वास ठेवू लागतात. अशाप्रकारे गेल्या दोन्ही निवडणुकीच्या कालावधीत भाजपाने काँग्रेस विषयी खोटे विधाने करत लोकांना भ्रमित करून निवडणूका जिंकल्या.

त्यांनी केलेल्या आरोपाचे खंडन करण्यात काँग्रेस कार्यकर्ते कमी पडल्याने आपल्याला फटका बसला. काँग्रेसने गेली ७० वर्षे काय केले असा सवाल करणाऱ्या भाजपाने गेल्या सात वर्षात काँग्रेसने केलेल्या मोठ-मोठ्या शासकीय संस्था विकायल्या काढल्या आहेत.

अशी घणाघाती टिका काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांनी केली. नगर तालुका काँग्रेस कमेटीच्यावतीने टाकळी काझी येथे आयोजित कार्यकर्ता शिबिरात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रतापराव पाटील म्हणाले की, आपल्या जिल्ह्याला जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष पदावर विराजमान होण्याचा सन्मान काँग्रेस पक्षाला मिळाला.

या पदाच्या माध्यमातून जिल्हाभर व नगर तालुक्यातील शाळांना मोठ्या प्रमाणात शाळा खोल्यांची काम करण्यात आली. या कामाला आपल्याला निश्चित फायदा मिळेल.

समन्वयक ज्ञानदेव वाफारे म्हणाले की पूर्वीच्या काळाप्रमाणे काँग्रेसला पुन्हा सोनेरी दिवस येण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन संघटितपणे सुत्रबद्ध रीतिने कार्य करने गरजेचे आहे.

त्यातून स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका बरोबरच इतर निवडणुकात यश मिळण्यास मदत होईल .

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe