Maharashtra News:झारखंडमधील भाजपाच्या महिला नेत्या सीमा पात्रा यांनी आपल्या घरात काम करणाऱ्या आदिवासी महिलेला जिभेने शौचालय चाटायला लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
मोलकरीणीने व्हिडिओद्वारे या अन्यायालया वाचा फोडली. पात्रा यांना पोलिसांनी अटक केली आहे. भाजपा नेत्या सीमा पात्रा या माजी आयएएस अधिकारी माहेश्वर पात्रा यांच्या पत्नी आहेत.

त्यांनी घरकाम करणाऱ्या आदिवासी महिलेचा छळ केल्याचे समोर आले आहे. पात्रा यांनी कामासाठी या महिलेचा छळ केला. लोखंडी रॉडने या महिलेचे दात तोडले.
तिच्या अंगावर गरम सळईने चटकेही दिले. एवढेच नाही तर पात्रा यांनी या महिलेला जिभेने चाटून शौचालय स्वच्छ करण्यास भाग पाडले.
पात्रा यांच्या घरी काम करणाऱ्या सुनिता यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये त्या स्वतः आपल्यासोबत झालेल्या छळाची माहिती दिली आहे.
या आरोपांनंतर भाजपाने तात्काळ पात्रा यांना पक्षातून निलंबित केले आहे. आता पोलिसांनी पात्रा यांच्यावर अॅट्रोसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.