भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याला कोरोनाचा दुसऱ्यांदा विळखा

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :- कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे देशभरात हाहाकार उडाला आहे. सर्वसामान्यापाठोपाठ राजकीय नेते आणि मंत्र्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

यातच एक महत्वाची माहिती समोर आली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. दीड वर्षात गडकरींना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे.

दरम्यान राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण होण्याची मालिका सुरू झाली आहे. दिल्लीत भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या पाठोपाठ आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा सुद्धा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

याबाबतची माहिती खुद्द नितीन गडकरी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर दिली आहे. तसेच त्यांनी संपर्कात आलेल्या सर्वांना कोरोना चाचणी करुन घेण्याचे आवाहन केले आहे.

सध्या गडकरी यांची प्रकृती उत्तम असून त्यांना सौम्य लक्षणे आहेत. तसेच सध्य ते गृहविलगीकरणात आहेत. त्याच्यावर उपचार सुरु आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe