मुंबई : शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा काश्मिरी पंडितांच्या (Kashmiri Pandits) मुद्द्यावर केंद्र सरकार (Central Government) व भाजपला (Bjp) अनेक सवाल केले आहेत. संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना अनेक प्रश्न मांडले आहेत.
तिकडे काश्मीर हिंदुंच्या (hindu) रक्ताने रोज भिजून चालला आहे. रोज काश्मिरी पंडितांच्या हत्या होत आहेत. हिंदू समाजातील इतर लोकांच्या हत्या सुरू आहेत. आठ वर्ष कसले साजरी करताय? असा संतप्त सवार करतानाच भाजपला (bjp) टीका करायला काय झालं? काश्मीर पंडित मरत आहेत. त्यावर बोला.

टीका कसली करताय? १९९० मध्ये काश्मीर पंडितांची हत्या व पलायन झालं. तेव्हा भाजपच सत्तेवर होतं. आताही सत्तेवर आहे, असं शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले आहेत.
तसेच भाजपच्या रिपोर्ट कार्डमध्ये काश्मीर पंडितांच्या घरवापसीचा मुद्दा आहेत का? सर्जिकल स्ट्राईकनंतरही हत्या थांबल्या नाहीत, असं सांगतांनाच काश्मीर पुन्हा जळत आहे. काश्मीरमध्ये रक्तपात होत आहे. काश्मीरची परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर गेली असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
त्याचसोबत आमचे दिल्लीचे (Delhi) प्रमुख लोक सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. कधी काश्मीर फाईल्सचं प्रमोशन होतंय, तर कधी पृथ्वीराजचं प्रमोशन होतंय. पण काश्मिरी पंडितांचा आक्रोश कोणी ऐकायला तयार नाही, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काश्मिरी पंडितांच्या पलायनवर निवेदन दिलं आहे. उद्धव ठाकरेंनी चिंता व्यक्त केली आहे. महाराष्ट्राची सरकार आणि शिवसेना काश्मीर पंडितांच्या बाजूने राहिल. त्यांना त्यांच्या कुटुंबीयांना काही मदत असल्यास आम्ही देऊ.
त्यांच्यासाठी महाराष्ट्र सरकार एक योजना तयार करत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या काळापासून काश्मीर पंडितांचं आणि शिवसेनेचं एक नातं राहिलं आहे, असेही राऊत म्हणाले आहेत.