Body Moles Astrology : प्रत्येकाच्या शरीराच्या अनेक भागांवर काळे, तपकिरी आणि लाल रंगाचे तीळ असतात. हे तीळ चेहऱ्यावर असेल तर ते खूप सुंदर दिसते. मात्र ज्योतिष शास्त्रानुसार हे तीळ तुमच्या आयुष्यातील अनेक रहस्य सांगत असतात.
अनेकांना याची कल्पना नसते. शरीराच्या काही ठिकाणी तीळ असणे भाग्यवान असते, त्यामुळे काहीवेळा ते अशुभ असते. तुम्हाला आता तुमच्या जोडीदाराच्या तीळाची खूण पाहून तुम्ही त्याच्या मनातील रहस्य सहज जाणून घेऊ शकता. कसे ते पहा,
काय आहे तीळाचा अर्थ
1. तुमच्या कपाळावर तीळ असल्यास तुम्हाला आयुष्यातील दीर्घ संघर्षानंतर पैसे तर मिळतील, परंतु तुम्ही अवाजवी खर्चही करू शकता.
2. तुमच्या भुवयावर किंवा दोन्ही भुवयांमध्ये तीळ असल्यास तुमचे वैवाहिक जीवन चांगले राहू शकते. तसेच असे लोक खूप बुद्धिमान असतात.
3. ज्या लोकांच्या नाकावर तीळ असते, अशा लोकांना त्यांची झोप खूप आवडत असून अशा लोकांना राग खूप लवकर येतो. अशा लोकांना पैशाशी निगडित कोणतीही समस्या निर्माण होत नाहीत.
4. जर एखाद्याच्या गालाच्या उजव्या बाजूला तीळ असल्यास अशी व्यक्ती श्रीमंत असते. जर गालाच्या डाव्या बाजूला तीळ असेल तर अशी व्यक्ती खर्चिक असून गालावरील तीळ व्यक्तीला खूप आकर्षक बनवते.
5. जर कोणाच्या ओठावर तीळ असल्यास अशा व्यक्तीला त्याच्या लाइफ पार्टनरकडून खूप प्रेम मिळते. मात्र ओठाच्या डाव्या बाजूला तीळ असल्यास लाइफ पार्टनरसोबत मतभेद होतात. तसेच अशा लोकांना छान कपडे घालण्याची आवड असते.
6. जर एखाद्याच्या हनुवटीवर तीळ असेल तर अशी व्यक्ती आपल्या आयुष्यात समाधानी असून असे लोक फारसे सामाजिक नसतात.
7. ज्या लोकांच्या डोळ्यांवर तीळ असते, असे लोक खूप भावूक असून ते उच्च विचारसरणीचे असतात.