अहमदनगर Live24 टीम, 17 एप्रिल 2022 maharashtra news :- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नव्या भूमिकेमुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर ‘हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया’ हे पुस्तक लिहिणारे विदेशी लेखक जेम्स लेन पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
लेन्स यांना शिवचरित्रकार बाबासाहेब पुरंदरे यांनीच माहिती दिल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या निमित्ताने पुन्हा एकदा सांगितलं आहे.
आता मात्र, लेखक जेम्स लेन यांचीही बाजू पुढं आली आहे. एका वृत्तवाहिनीनं लेन यांची मुलाख घेतली. त्यामध्ये लेन यांनी म्हटलं आहे की, “हे पुस्तक लिहिताना पुरंदरे यांच्याकडून त्यासाठी आवश्यक असलेली माहिती घेतली नव्हती.
त्यामुळं पुरंदरे या पुस्तकाचे स्त्रोत आहेत, असं म्हणता येणार नाही.” आता लेन यांच्या या उत्तराचे राज्याच्या राजकारणात पुन्हा पडसाद उमटणार आहेत.
ठाकरे यांनी पुरंदरे यांचं समर्थन करीत पवार यांच्यावरच आरोप केले होते. पवारांनी जातीयवाद पसरविल्याचा आरोप करताना ठाकरे यांनी हा संदर्भ दिला होता.
त्यानंतर उत्तर देताना पवार यांनी आपल्या जुन्या विधानावर ठाम राहत पुरंदरे यांनीच छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास मांडल्याचं आणि त्यांच्यात माहितीवरून लेन यांनी पुस्तक लिहिल्याचं सांगितलं होतं.
आता लेन यांनी स्पष्टीकरण दिल्याने ठाकरे आणि पवार काय भूमिका घेणार? याकडे लक्ष लागलं आहे.