Maharashtra : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. राहुल गांधी यांनी या यात्रेतील पत्रकार परिषदेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने भाजप आणि शिवसेना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच आघाडीत पडू शकते असा इशारा दिला आहे.

संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रात येऊन सावरकरांची बदनामी करणं हे आम्हाला आणि काँग्रेसलाही मंजूर नाही. इथे येऊन सावरकरांवर बोलण्याची काही गरजच नव्हती. त्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडू शकते. हे मी तुम्हाला सांगतो असा थेट इशाराच संजय राऊत यांनी राहुल गांधी यांना दिला आहे.
पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी राहुल गांधी यांना हा विषय काढायची गरजच नव्हती असे म्हणाले. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला देशभरात चांगला प्रतिसाद मिळत आहे.
या यात्रेला महाराष्ट्रात सर्वाधिक प्रतिसाद मिळाला आहे. बेरोजगारीपासून हुकूमशाहीच्या मुद्द्यावर त्यांची रॅली सुरू आहे. असं सुरू असताना हा विषय काढण्याची गरज नव्हती असेही राऊत म्हणाले.
सावरकरांचा विषय काढल्याने शिवसेनेलाच धक्का बसला असे नाही. राज्यातील काँग्रेस नेत्यांनाही धक्का बसला. राहुल गांधी यांनी सावरकरांवर टीका केल्याने राज्यातील काँग्रेस नेत्यांची अवस्था बिकट झाली आहे.
महाराष्ट्र आणि देशातील लोकांना सावरकरांबद्दल आदर. इतिहासात काय घडले आणि काय नाही हे चिवडत बसण्यापेक्षा नवा इतिहास निर्माण करावा. त्या मताचे आम्ही आहोत. राहुल गांधींनी त्याकडे लक्ष द्यावे असा सल्ला संजय राऊत यांनी येवेळी दिला आहे.
सावरकर हे भाजप आणि संघाचे श्रद्धास्थान कधीच नव्हते. सावरकर हे त्यांचे आदर्श पुरुष कधीच नव्हते. आता राजकारणासाठी त्यांनी सावरकरांचा विषय घेतला आहे. बाळासाहेबांनी शिवसेनेच्या स्थापनेपासून हिंदुत्वाचा पुरस्कार केला आहे. तो आजचा नाही,असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.