Breast Cancer: देशासह संपूर्ण जगात ब्रेस्ट कॅन्सरची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे आम्ही तुम्हाला सांगतो स्तनाच्या कर्करोगाच्या लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नये नाहीतर भविष्यात याची मोठी किंमत मोजावी लागू शकते. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि लठ्ठपणा हे देखील स्तनाच्या कर्करोगाचे कारण असू शकते. त्यामुळे स्तनाचा कर्करोग स्तनाच्या कोणत्याही भागात सुरू होऊ शकतो. यामुळे आम्ही तुम्हाला या बातमी काही टीप्स सांगणार आहोत जे तुम्ही टिप्स फॉलो केल्यास स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी करता येऊ शकतो.
स्तनाचा धोका या मार्गांनी कमी करता येतो
हेल्दी डाइट
निरोगी आहारामुळे स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो. त्यामुळे अशा परिस्थितीत आरोग्यदायी आहार घेतल्यास स्तनाचा कर्करोग कमी होऊ शकतो.त्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात फळे आणि भाज्यांचे सेवन करू शकता.
तुमचा कौटुंबिक इतिहास जाणून घ्या
कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास असलेल्या महिलांनी अधिक सावधगिरी बाळगली पाहिजे. म्हणूनच स्त्रियांना त्यांचा कौटुंबिक इतिहास समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुमच्या आईला किंवा बहिणीला स्तनाचा किंवा गर्भाशयाचा कर्करोग असेल तर तुम्हाला त्याचा धोका जास्त असतो. म्हणूनच तुमच्या कुटुंबाचा इतिहास जाणून घ्या.
स्तनपान
स्तनपानामुळे कर्करोगाचा धोका कमी होण्यास मदत होते. यासोबतच हे मुलांच्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. यासोबतच स्तनपान करणा-या महिलांसाठी देखील हे खूप महत्वाचे आहे.
धूम्रपान टाळा
अनेक महिला रोज धूम्रपान करतात.पण तसे करणे टाळावे. कारण त्यामुळे कर्करोग होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही धूम्रपान करत असाल तर ते लवकरात लवकर सोडण्याचा प्रयत्न करा.
(अस्वीकरण: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ते अंगीकारण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या. आम्ही याची पुष्टी करत नाही.)
हे पण वाचा :- Honda Activa Offers: धमाका ऑफर ! फक्त 20 हजारांमध्ये घरी आणा होंडा एक्टिवा ; पाहून लागेल तुम्हाला वेड