Maruti Car : जबरदस्त मायलेज असणारी मारुतीची कार फक्त 60 हजारांमध्ये आणा घरी, कुठे मिळतेय संधी जाणून घ्या

Published on -

Maruti Car : मारुती सुझुकी ही देशातील आघाडीची कार निर्माता कंपनी आहे. या कंपनीच्या अनेक कार खूप लोकप्रिय आहेत. कंपनीच्या अनेक कार्स खूप मायलेज देतात त्यामुळे त्यांना चांगला प्रतिसाद मिळतो.

जर तुम्ही स्वस्तात चांगली कार शोधत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण मारुतीची अल्टो तुम्ही खूप कमी किमतीत खरेदी करू शकता. ही सवलत कुठे मिळत आहे ते जाणून घेऊयात.

कंपनीने चार प्रकारांमध्ये मारुती अल्टो 800 लॉन्च केली असून त्यांची किंमत 3.39 लाख रुपयांपासून ते 5.03 लाख रुपयांपर्यंत आहे. किंमत कमी असली तरीही अनेकांना ही कार घेता येत नाही. परंतु, तुम्ही ही कार निम्म्या किमतीत खरेदी करू शकता. अनेक वेबसाइट्सवरून तुम्ही ही कार खरेदी करू शकता.

अशी आहे डील

1. OLX

OLX वेबसाइटवर तुम्ही सेकंड हँड ही कार तुम्ही खरेदी करू शकता, अल्टोचे 2009 चे मॉडेल दिल्ली नोंदणीसह येथे सूचीबद्ध असून किंमत 60,000 रुपये आहे, परंतु तुम्हाला यावर इतर कोणतीही ऑफर किंवा फायनान्स प्लॅन दिला जाणार नाही.

2. DROOM

तसेच तुम्ही DROOM वेबसाइटवरून कार घेऊ शकता. हे 2010 चे मॉडेल जे दिल्लीत नोंदणीकृत असून किंमत 75 हजार रुपये निश्चित केली आहे. तसेच तुम्हाला या कारसोबत फायनान्स प्लॅनची ​​सुविधा मिळत आहे.

3. CARTRADE

CARTRADE या वेबसाइटवरून कार घेऊ शकता.अल्टोची 2011 च्या मॉडेलची किंमत 95 हजार रुपये असून तुम्हाला कोणतीही फायनान्स ऑफर मिळणार नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe