EV Scooter : सिंगल चार्जमध्ये 120 किमीपर्यंतची तगडी रेंज देणारी स्कूटर अवघ्या 1593 रुपयांत आणा घरी, कुठे मिळत आहे संधी पहा

Ahmednagarlive24 office
Published:

EV Scooter : देशात इंधनाच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहने खरेदी करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. मागणी वाढली असल्याने कंपन्याही इलेक्ट्रिक वाहने लाँच करत आहेत. अशातच आता zelio Eeva आपली इलेक्ट्रिक स्कुटर बाजारात आणली आहे.

जर तुम्हाला ही स्कुटर खरेदी करायची असेल तर तुम्ही ती 55 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. ही स्कुटर सिंगल चार्जमध्ये 120 किमी चालते. यात रिव्हर्स पार्किंग, एलईडी हेड टेल लाईट सारखी फीचर्स उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

उपलब्ध आहेत दोन वेगवेगळी व्हेरिएंट

मीडिया रिपोर्ट्सनुसार, Zelio Eeva इलेक्ट्रिक स्कूटरचे दोन वेगवेगळे व्हेरिएंट बाजारात उपलब्ध आहेत. यातील एक बॅटरी पॅक 28 Ah 48 V आणि दुसरे टॉप व्हेरिएंट बॅटरी पॅक 28 Ah 60V सह येते. या इलेक्ट्रिक स्कूटरची कमाल रेंज सिंगल चार्जमध्ये सुमारे 120 किलोमीटर असल्याचा कंपनीचा दावा आहे. बॅटरी पॅकनुसार, तिची किमान श्रेणी 60 किमी आहे. EV स्कूटर 54575 रुपयांच्या एक्स-शोरूम पासून उपलब्ध आहे.

मिळत आहेत आधुनिक फीचर्स

या स्कुटरची बॅटरी पूर्ण चार्ज होण्यास एकूण 4 ते 5 तास लागतात. कंपनीने यात इन्स्ट्रुमेंट कन्सोल, अँटी थेफ्ट अलार्म, यूएसबी चार्जिंग पॉइंट, डीआरएल, डिजिटल ट्रिप मीटर, पुश बटण स्टार्ट, फ्रंट स्टोरेज, रिव्हर्स पार्किंग, एलईडी हेड टेल लाईट इत्यादी फीचर्स दिली आहेत. इतकेच नाही तर त्याच्या पुढच्या चाकात डिस्क ब्रेक आणि मागच्या चाकात ड्रम ब्रेक देण्यात येत आहे. या स्कुटरचे कंपनी फक्त 1,593 रुपयांमध्ये स्कूटरचे बुकिंग घेत आहे. उर्वरित रक्कम सुलभ हप्त्यांमध्ये भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe