Broadband Plan : सध्याच्या डिजीटल युगात सर्व काही इंटरनेटवर अवलंबून असून प्रत्येक गोष्टीला इंटरनेट गरजेचे असते. एकंदरीतच शिक्षणापासून ते नोकरी बऱ्याच गोष्टी इंटरनेटवर अवलंबून आहेत. यासाठी खूप डाटा गरजेचा असतो.
सध्या असे काही ब्रॉडबँड प्लॅन आहेत, ज्यात कॉलिंग आणि डिस्ने हॉटस्टार चे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल. असा एक 60Mbps स्पीड असलेल्या ब्रॉडबँड प्लॅन आहे, जो तुम्हाला 3 महिन्यांसाठी मोफत वापरता येईल. जाणून घ्या सविस्तर.

दरमहा मिळेल 3300GB डेटा
किमतीचा विचार केला तर Fiber Basic Plus OTT नावाच्या या प्लॅनची किंमत 666 रुपये प्रति महिना आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला 60Mbps च्या फास्ट इंटरनेट स्पीडसह 3300GB डेटा मिळेल. डेटा कोटा संपल्यानंतर, तुम्हाला 4Mbps स्पीडने इंटरनेट वापरता येईल.
या प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग (लोकल एसटीडी) सुविधा उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये OTT फायदे म्हणून, या प्लॅनमधील ग्राहकांना Disney Hotstar चे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल.
मिळेल अतिरिक्त वैधता
खरंतर, जर तुम्ही दीर्घ वैधतेसाठी प्लॅन खरेदी केला तर तुम्हाला कंपनीकडून अतिरिक्त वैधता मोफत मिळेल. समजा तुम्ही हा प्लॅन 1 महिना किंवा 6 महिन्यांसाठी घेतल्यास तर तुम्हाला कोणतीही अतिरिक्त वैधता मिळत नाही. परंतु जर तुम्ही 12 महिने आणि 24 महिने पर्याय निवडला तर तुम्ही अतिरिक्त वैधतेसाठी पात्र असणार आहात.
– तुम्ही हा प्लॅन एका महिन्यासाठी खरेदी केल्यास तुम्हाला प्रति महिना 666 रुपये द्यावे लागणार आहेत. समजा तुम्ही ते 6 महिन्यांसाठी विकत घेतले तर तुम्हाला एकरकमी 3663 रुपये द्यावे लागणार आहेत, म्हणजेच तुम्ही 333 रुपये वाचवू शकता.
– तुम्ही हा प्लॅन 12 महिन्यांसाठी विकत घेतल्यास तर तुम्हाला 7992 रुपये एकरकमी भरावे लागणार आहेत आणि तुम्हाला 1 महिन्याची एक्स्ट्रा व्हॅलिडिटी मोफत मिळू शकते. म्हणजे 12 महिन्यांच्या पेमेंटवर तुम्हाला ते 13 महिन्यांसाठी वापरता येईल.
– तुम्ही 24 महिन्यांसाठी प्लॅन विकत घेतला तर तुम्हाला एकरकमी 15,984 रुपये द्यावे लागणार आहेत पण यात तुम्हाला 3 महिन्यांची एक्स्ट्रा व्हॅलिडिटी पूर्णपणे मोफत मिळू शकते. म्हणजे 24 महिन्यांसाठी पैसे भरले तर तुम्हाला ते 27 महिन्यांसाठी वापरता येईल.