BSNL Prepaid Plans : BSNL ने दिला जियो, एअरटेल आणि व्ही कंपन्यांना धक्का! मिळणार 5 रुपयात दररोज 2 जीबी डेटा

Published on -

BSNL Prepaid Plans : जियो (Jio), एअरटेल (Airtel), वोडाफोन (Vodaphone) आणि आयडिया (Idea) या तगड्या कंपन्यांना BSNL ने धक्का दिला आहे. कारण BSNL ने नुकताच नवीन प्लॅन लाँच केला आहे, यामुळे BSNL ग्राहकांना अवघ्या पाच रुपयात 2 जीबी डेटा मिळत आहे.

BSNL 5 रुपयांत 2GB दैनंदिन डेटा देत आहे!

बीएसएनएलच्या त्या प्लॅनमध्ये युजर्सना (Users) फक्त 5 रुपयांमध्ये दररोज 2GB डेटा दिला जात आहे. वास्तविक हा प्लॅन 97 रुपयांचा आहे, यामध्ये दररोज 2GB डेटा दिला जात आहे आणि त्याची वैधता 18 दिवस आहे.

त्यानुसार, तुम्हाला फक्त 5 रुपयांमध्ये दररोज 2GB डेटा मिळत आहे. हा प्लॅन अमर्यादित व्हॉईस कॉलिंगसह येतो आणि लोकधुन कंटेंटचा फायदाही यामध्ये देण्यात आला आहे.

बीएसएनएलचा 87 रुपयांचा प्लॅन

हा प्लॅन १०० रुपयांच्या खाली असलेल्या तीन प्लॅनमध्ये सर्वात स्वस्त आहे आणि त्याची किंमत ८७ रुपये आहे. या प्लॅन अंतर्गत, BSNL आपल्या वापरकर्त्यांना 14 दिवसांसाठी दररोज 1GB डेटा आणि अमर्यादित व्हॉईस कॉलिंगचे फायदे देत आहे. या प्लॅनमध्ये दररोज १०० एसएमएस आणि सात गेम सुविधेसह येतात.

बीएसएनएलचा 99 रुपयांचा प्लॅन

BSNL चा 100 रुपयांखालील सर्वात महागड्या प्लॅनची किंमत 99 रुपये आहे. बीएसएनएलचा हा प्लॅन खरेदी करणाऱ्या युजरला 97 रुपयांच्या प्लॅनसाठी 18 दिवसांची वैधता मिळते आणि त्यामध्ये सर्व नेटवर्कवर अमर्यादित व्हॉईस कॉलिंग सुविधा दिली जात आहे.

या प्लॅनमध्ये तुम्ही तुमच्या आवडीची कॉलर ट्यून देखील सेट करू शकता परंतु यामध्ये डेटा आणि एसएमएसचे फायदे समाविष्ट नाहीत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News