BSNL Recharge Plan : बीएसएनएलचा धमाकेदार रिचार्ज प्लॅन ! 107 रुपयांमध्ये 84 दिवस आणि बरेच काही…

BSNL Recharge Plan : टेलिकॉम कंपन्यांकडून दिवसेंदिवस ग्राहकांसाठी जबरदस्त योजना आणल्या जात आहेत. तसेच ग्राहकांना खुश करण्यासाठी आता बीएसएनएलने देखील एक स्वस्तात मस्त रिचार्ज प्लॅन आणला आहे. यामध्ये कमी किमतीत ३ महिन्यांची मुदत मिळत आहे.

तुम्हीही बीएसएनएल कंपनीचे ग्राहक असाल तर तुम्हीही या योजनेचा फायदा घेऊ शकता. तसेच या योजनेमुळे तुमच्या पैशांची देखील बचत होणार आहे. 150 रुपयांपेक्षा कमी किमतीमध्ये कंपनीकडून रिचार्ज प्लॅन सादर करण्यात आले आहेत.

150 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

बीएसएनएल कंपनीने 150 रुपयांपेक्षा कमी किमतीमध्ये प्लॅन आणला आहे. यामध्ये 107 रुपयांच्या रिचार्जमध्ये 1GB डेटा सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय इतरही अनेक सुविधा दिल्या जातात.

107 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

BSNL कंपनीकडून सर्वात कमी आणि जास्तीत जास्त दिवस चालणारा रिचार्ज प्लॅन सादर करण्यात आला आहे. 107 रुपयांचा रिचार्ज प्लॅन 84 दिवसांच्या वैधतेसह येतो. यात अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि 1GB डेटा सुविधा देण्यात आली आहे.

या प्लॅनचे वैशिष्ट्य म्हणजे हा एक दीर्घ वैधता योजना आहे. यामध्ये, प्लॅन 84 दिवसांच्या म्हणजेच सुमारे 3 महिन्यांच्या वैधतेसह येतो. सिम अॅक्टिव्ह ठेवण्यासाठी हा प्लान सर्वोत्तम असल्याचे सांगितले जात आहे.