Budget 2022 : आज देशाचा अर्थसंकल्प सादर होणार

Published on -

अहमदनगर Live24 टीम, , 01 फेब्रुवारी 2022 :- अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज (१ फेब्रुवारी) ११ वाजता अर्थसंकल्प सादर करतील. यावेळी देखील हा अर्थसंपकल्प पेपरलेस असणार आहे.

वाढती महागाई, बेरोजगारांची वाढलेली संख्या, घसरता रुपया, निर्गुंतवणूक, खनिज तेलाचे वाढत असलेले दर अशी अनेक आव्हानं सीतारामन यांच्यासमोर आहेत.

आजच्या अर्थसंकल्पानंतर काय महाग होणार, काय स्वस्त होणार याकडेही देशवासीय डोळे लावून बसले आहेत कोरोना संकटातून अर्थव्यवस्था सावरत आहे.

येत्या आर्थिक वर्षात अर्थव्यवस्था वाढीचा वेग ८ ते ८.५ टक्के इतका राहिला, असं केंद्र सरकारचा आर्थिक पाहणी अहवाल सांगतो. कोरोना संकटातून उभ्या राहणाऱ्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्याचं आव्हान सीतारामन यांच्यासमोर आहे.

कोरोनाचा मोठा फटका ऑटोमोबाईल, बांधकाम, पर्यटनासह अनेक क्षेत्रांना बसला. त्यामुळे या क्षेत्रांसाठी काय घोषणा होतात त्याकडे कोट्यवधी भारतीयांचं लक्ष लागलं आहे.

गेल्या ८ वर्षांत कर रचनेत कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे यंदा तरी नोकरदार करदात्यांना दिलासा मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. .

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe